राज्यात 5 ऑगस्टपर्यंत मान्सून कसा राहील पंजाबराव डख..!
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 27 जुलै रोजी एक नवीन हवामान अंदाज स्पष्ट केलेला आहे, त्यांनी दिलेल्या मागील हवामान अंदाज द्वारे राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच काही भागात अजूनही रिमझिमच पाऊस पडत आहे. तर आपण खाली पाहूया नवीन अंदाजाद्वारे काय माहिती आहे.
पंजाबराव डख यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून 5 ऑगस्ट पर्यंत भाग बदलतच पडणार आहे, काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच 30 जुलै पर्यंत मान्सूनचा जोर अधिकच राहण्याची शक्यता आहे, असे पंजाबराव डख सांगतात, mansoon update today
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोकणात मान्सूनचा जोर 5 ऑगस्टपर्यंत अधिक राहील, तसेच कोकणपट्टी या भागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे, 28 ते 30 जुलै दरम्यान अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी मान्सूनची उघडीप पाहून शेतीचे कामे करून घ्यावी, मान्सून भाग बदलत सुरू राहणार आहे.