राज्यात या भागात 6 ते 14 जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता.
आपले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 6 ते 8 जून दरम्यान तुरळीक ठिकाणी भाग बदल पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी पावसाची एक वीत ओल गेली असेल तर पेरणी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तसेच राज्यांमध्ये 9 ते 14 जून दरम्यान मुंबई, पुणे,नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, आणि उत्तर महाराष्ट्राकडे, या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. असे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.
राज्यात 6 जून ते ८ पर्यंत या भागात पावसाची शक्यता आहे. जालना, बीड, संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, जळगाव, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, धुळे, सोलापूर, नंदुरबार, वाशिम या भागात 6 ते 8 जून दरम्यान भाग बदलत चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस पडला असेल तर तुम्ही पेरणी करू शकता. असा ही सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे.
या भागात 9 ते 13 जून दरम्यान नद्या, नाल्या,ओढे, वाहतील असा पाऊस पडणार आहे. सातारा, सांगली, पुणे, नगर, नाशिक, मुंबई, कोकणपट्टी, धुळे, नंदुरबार, जळगाव, या भागात 9 ते 13 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. ( panjabrao dakh today mansoon update )
युट्युब द्वारे पाहण्यासाठी ( click )