राज्यात या तारखेपासून या भागात सूर्यदर्शन होणार..?
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील अनेक दिवसापासून राज्यात रिमझिम स्वरूपाचा भाग पद्धत मान्सून कायम सुरूच आहे, आणि शेतकऱ्यांना शेती पिकाचे कामे ही करायला अवघड झालेली आहे, आता मान्सून कोणत्या तारखेपासून विश्रांती घेणार आहे, व कोणत्या भागात सात ते आठ दिवस सूर्यदर्शन देखील पडणार आहे, संपूर्ण माहिती हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 7 ऑगस्ट रोजी दिलेली आहे.
राज्यात 8 ते 11 ऑगस्ट पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, या भागात मान्सूनचा अधिक जोर असणार आहे, तसेच राज्यातील काही भागात भाग बदलत मान्सून या तारखे दरम्यान पडणार आहे, तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान अनेक भागात सूर्यदर्शन होणार आहे, या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी शेती पिकाचे कामे पूर्ण करून घ्यावी, परत 18 ऑगस्ट नंतर मान्सून ची दाट शक्यता वर्तवलेली आहे.
मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, बीड, परभणी जालना, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, या भागात 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान जास्त सूर्यदर्शन राहणार आहे, असे पंजाबराव डख सांगतात. शेतकऱ्यांनी सूर्यदर्शन पाहून शेती पिकाची कामे करून घ्यावी, तसेच याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा. Panjabrao dakh update