राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता..
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे, या कारणामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात देखील नुकसान होत चाललेलं आहे, अशा अवस्थेमध्ये सध्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आलेले आहे किंवा अनेक शेतकऱ्यांनी काढून सुद्धा ठेवलेली आहे. तर राज्यात अजून किती दिवस मान्सून सुरू राहणार आहे, याची संपूर्ण माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजा नुसार राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे, तसेच या पावसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विजेचा प्रभाव अधिक असणार आहे , त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची व आपल्या देखील जनावरांची सुद्धा देखील काळजी घ्यावी. 26 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण ऊत्तर मुंबई कोकण किनारपट्टी, पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
तसेच मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्र, अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार आहे, तरी शेतकऱ्यांनी सावधान राहावे, ज्या शेतकऱ्यांची शेतमळे नदीकाठी आहे अशा शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त सतर्क राहावे. आणि पाऊस देखील सुरू असताना झाडाखाली उभा राहू नये असे पंजाबराव डख सांगतात.
अचानक पणे वातावरणात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल तुम्ही जर आमच्या वेबसाईटला नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की सामील व्हा..