राज्यात 16 ते 26 जुलै दरम्यान या भागात अतिवृष्टी होणार..!
दिनांक 14 जुलै 2024 रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिलेला आहे. त्या अंदाजानुसार राज्यात 26 जुलै पर्यंत अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सुद्धा इशारा दिला आहे. तर आपण पाहूया 26 जुलै पर्यंत कोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा आहे. व कोणत्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.( mansoon update panjabrao dakh )
मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात दोन दोन दिवसाच्या मुक्कामात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी दिली आहे. तसेच 15 ते 18 जुलै दरम्यान कोकणात आणि मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिली आहे, तसेच सर्व नागरिकांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
तसेच राज्यात 21 ते 26 जुलै दरम्यान सर्व भागात पाऊस पडणार आहे असे पंजाबराव म्हणतात, पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली युट्युब व्हिडियो द्वारे सुद्धा पाहू शकता. दोन ते तीन दिवस मुंबईत आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे.