येत्या 48 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता..
हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी येत्या 48 तासात कोणत्या भागात, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट दिला आहे हे आपण पाहूया. तसेच त्यांनी आज आणि उद्या कोणत्या भागासाठी मुसळधार पावसाची शक्यता दिली हे पण जाणून घेऊया. राज्यात मागील दोन ते तीन दिवसापासून अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी ही झालेली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील नद्या, नाल्या, ओढ्या ला ही पूर आलेला आहे.
तसेच आज 9 जुलै 2024 हवामान खात्याकडून ( IMD ) पुणे, रत्नागिरी सातारा, सिंधुदुर्ग, येत्या 48 तासात या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच या जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज ही हवामान खात्याने वर्तवलेला आहे. के एस होसाळीकर यांनी पुढील 48 तासात हवामान कसे राहील, व पावसाचा जोर कोणत्या ठिकाणी राहील याची संपूर्ण माहिती दिली आहे.
Ks होसाळीकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार उत्तर, मध्य महाराष्ट्र या भागात येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मध्यम पावसाचा अंदाज ही वर्तवला आहे. तसेच विदर्भात अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून जाहीर झाला आहे.
हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही खाली युट्युब व्हिडियो द्वारे सविस्तर पाहू शकता. 👇🏻