येत्या 24 तासात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज..!
हवामान तज्ञाच्या मुख्य प्रमुखांनी आज येत्या २४ तासांमध्ये काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे, तसेच तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा ही अंदाज दिला आहे, तर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
येत्या 24 तासांमध्ये रत्नागिरी आणि सातारा या भागांमध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे, तसेच पुणे आणि पैगा या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.
तसेच पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,रायगड, नंदुरबार, भंडारा,या भागात सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
तसेच जळगाव,जालना, संभाजीनगर, अहमदनगर, बीड परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, या भागात हवामान खात्याने तुरळीक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे.