येत्या 24 तासात आज ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट चा दिला इशारा..!
हवामान खात्याच्या माहितीनुसार मागील काही दिवसात काही भागात चांगल्याच प्रमाणे मान्सून ने धुमाकूळ घातलेला आहे, आणि अजूनही काही भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल जाणून घेऊया सविस्तर माहिती.( Whether update of imd )
आज शुक्रवार हवामान खात्याने या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, आणि सिंधुदुर्ग, सातारा या भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा अंदाज ही व्यक्त केलेला आहे. तरी या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. तसेच पुढील पाच दिवस कसे हवामान राहील याचीसुद्धा अपडेट दिलेली आहे.
तसेच आज कोकणातील मुंबई, पुणे नागपूर, सिंधुदुर्ग,रायगड,अमरावती ठाणे, पालघर आणि वर्धा या भागात सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच मराठवाड्यात कोल्हापूर, नांदेड, हिंगोली,जालना परभणी, नगर या जिल्ह्यात सुद्धा येल्लो अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज आहे. IMD UPDATE