या महिलांना आता चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यात सुपरहिट प्रमाणे राबवली जात आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी 15 ऑगस्ट च्या आत अर्ज केलेला होता व तो अर्ज पात्र झालेला होता, अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये वितरित केलेले आहे, तसेच चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
अनेक महिलांच्या मनात प्रश्न पडलेले होते की या योजनेचे पैसे राज्य सरकार कधी देणार व ही योजना कधीपर्यंत सुरळीत चालू राहणार अशा अनेक सदस्यांना ही देखील प्रश्न जाणवत होते, परंतु या योजनेचे राज्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा केलेले आहे, यात कसला ही घोटाळा देखील झालेला नाही.
तसेच आता ज्या महिलांनी अर्ज केलेले होते परंतु त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशा महिलांनी बँक पासबुक ला आधार लिंक करून घ्यावे, आणि ज्या महिलांचे अजूनही देखील अर्ज करायचे बाकी आहे अशा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे.
ज्या महिलेला हप्ता मिळाला नाही व ज्या महिला आता अर्ज करतील अशा महिलांना सोबतच पुढच्या महिन्यामध्ये 4500 रुपये देखील मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. त्यामुळे महिलांनी घाबरू नये, आतापर्यंत राज्यातील 3 कोटी महिलांनी सरकारकडे अर्ज केलेले आहेत, आणि तसेच अजूनही अनेक अर्ज बाकी आहेत.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा, व आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर नक्की व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..!