या तारखेला मान्सून महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात कसा पाऊस..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनच आगमन कधी होणार व कोणत्या महिन्यात कसा पाऊस पडेल, याची संपूर्ण माहिती त्यांनी वर्तवली आहे. तर आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया की पेरणी योग्य पाऊस कधी पडेल..? व पावसाच आगमन देखील अंदमाणात कधी होणार आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया. Panjabrao dakh mansoon update
22 मे 2024 या रोजी मान्सूनच आगमन देखील अंदमाणात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि राज्यात 12 ते 13 जून रोजी पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. तर महाराष्ट्रात पेरणी योग्य मान्सूनच आगमन 22 जून च्या नंतर होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी देखील होऊ शकते. Mansoon update mharashtra
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार जून मध्ये कमी पाऊस आणि जुलै मध्ये जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि ऑगस्ट मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल व सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. जर अचानक हवामानात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल. अशी माहिती पंजाबराव यांनी दिली.