या तारखेपर्यंत शेतीची कामे करून घ्यावे पुन्हा मान्सून येणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्या अंदाजा द्वारे त्यांनी पुढील 7 ते 8 दिवस कोणत्या भागात कडक सूर्यदर्शन राहील व कोणत्या भागात मान्सून राहील, याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे, तसेच त्यांनी मागील दिलेला हवामान अंदाज पूर्णपणे खरा ठरलेला आहे, की राज्यात सूर्यदर्शन होणार म्हणून..
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार मराठवाड्यामध्ये 18 ऑगस्ट पर्यंत कडक सूर्यदर्शन राहणार आहे, 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील तुरळीक ठिकाणी सायंकाळी मान्सून पडणार आहे, तरी शेतकऱ्यांनी 18 तारखेपर्यंत आपल्या शेती पिकाची खुरपणी, फवारा, पाळी, खत टाकणे, अशा अनेक अडचणी करून घ्याव्या. असे पंजाब डख सांगतात.
उत्तर महाराष्ट्र मध्ये आज पासून ते 22 ऑगस्ट पर्यंत कडक सूर्यदर्शन होणार आहे. तसेच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात सुद्धा देखील सूर्यदर्शन अधिक होणार आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या भागातील शेतकऱ्यांनी 17 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे पूर्ण करून घ्यावी, या भागात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
राज्यात 18 तारखे नंतर रिमझिम स्वरूपाचा मान्सून पडणार नाही, मान्सून विजाच्या कडकडासह तसेच वादळी वाऱ्यासह पडणार आहे. पंजाबराव डख यांनी दिलेली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.. 👇🏻