या जिल्ह्यात उद्यापासून कडक सूर्यदर्शन होणार.. पंजाब डख
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मागील अनेक दिवसापासून भाग बदलत मान्सून कायम सुरूच आहे. अनेक भागात शेतकऱ्यांचे देखील नुकसान ही होत चाललेलं आहे. काही भागातील शेतकऱ्यांना आता सूर्यदर्शन ची अपेक्षा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करता यावी. तर पाहूया उद्यापासून कोणत्या जिल्ह्यात सूर्यदर्शन राहणार आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार राज्यात 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा, पश्चिम विदर्भ, अनेक भागात देखील सूर्यदर्शन राहणार आहे. तसेच नांदेड, यवतमाळ, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, बीड, संभाजीनगर, या भागात पुढील 8 ते 9 दिवस कडक सूर्यदर्शन राहणार आहे, असे पंजाबराव म्हणतात.
नाशिक, इगतपुरी, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, अकोट, बुलढाणा, नागपूर, या भागात अधून मधून भाग बदलत मान्सून सुरू राहणार आहे, तसेच कोकणपट्टी भागात सुद्धा मान्सून सुरू राहणार आहे, शेतकऱ्यांनी वेळ पाहून शेती पिकाची कामे करून घ्यावी, असे पंजाबराव डख साहेब म्हणतात.
राज्यात आजपासूनच वातावरणात बदल पाहायला मिळत आहे, परभणी जिल्ह्याततील शेतकऱ्यांचे पावसामुळे देखील खूप नुकसान झालेले आहे, 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. अशी माहिती पंजाब डख यांनी सांगितली, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली युट्युब व्हिडिओ नक्की पहा.. 👇🏻