मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये लवकरच..!
राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन राबवली जाणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना लवकरच अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक अटी व शर्ती रद्द करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून या योजनेचा भरपूर महिला लाभ घेतील. तर या योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत लवकर अर्ज करून टाकावे. तुम्ही अर्ज ऑफलाईन सुद्धा आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता.
या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचे तीन हजार रुपये 19 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर टाकले जाणार आहेत, 15 ऑगस्ट पूर्वी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, त्याच महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत. राहिलेल्या महिलांनी ही लवकर अर्ज करावे.