मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार येत्या 3 ते 4 दिवसात mansoon update today
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पावसाळा सुरू होत असल्या कारणाने शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मशागतीचे कामे पूर्ण पणे देखील पार पडलेले दिसून येत आहे. तरी आता सध्या शेतकरी बियाणे, खते, औषधे याच्या तडजोडीत आहेत. सर्व शेतकऱ्यांचे आता मान्सून कडे लक्ष वेधले आहे. तरी यंदा मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी दाखल झाला आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Ks.hosalikr
तरी आता सध्या मान्सून कर्नाटक मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये मान्सून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसेच के. एस. होसाळीकर यांच्यामते मान्सून दक्षिण महाराष्ट्र, रायलसीमा, गोवा, ओडिशा छत्तीसगड, उर्वरित कर्नाटक, या भागात मानसून 3 ते 4 दिवसात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच तळकोकणात 7 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
कृषी विभाग देत असलेल्या माहितीनुसार चांगला पाऊस झाल्यावरच आपण पेरणी करू शकता नाहीतर अपुऱ्या ओलीवर पेरणी केली तर पुन्हा पेरणी करायची वेळ येऊ शकते. असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पाऊस केव्हा येतो याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. अनेक शेतकरी उन्हाच्या तापमानामुळे हैरान झालेले आहे. ही संपूर्ण माहिती हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर दिली आहे. Whether update today