मान्सूनचा जोर वाढणार ऑगस्टमध्ये खंड पडणार का पहा..!

मान्सूनचा जोर वाढणार

मान्सूनचा जोर वाढणार ऑगस्टमध्ये खंड पडणार का पहा..!

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं जे काही सर्व शेती पिकाचे उत्पन्न असते ते सर्व हवामानावर अवलंबून राहते, जेणेकरून मान्सून कमी जास्त होण्यास सुरुवात झाली की आपल्या पिकावर संकट येयला सुरुवात होतात, त्यासाठी पंजाबराव डख यांनी 4 ऑगस्ट रोजी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, की राज्यात ऑगस्टमध्ये मान्सूनचा खंड पडणार का.. ही संपूर्ण माहिती या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया. Mansoon update

 

 

राज्यात 12 ऑगस्टपर्यंत मान्सून भाग बदलत देखील पडणार आहे, जेणेकरून मुंबई, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, या भागात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे, तसेच मराठवाड्यात काही भागात देखील सूर्यदर्शन आता बघायला मिळत आहे, तर काही भागात वातावरण मात्र खराबच आहे,

 

 

ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार नाही असे पंजाबराव डख म्हणतात, फक्त भाग बदलत मान्सून पडणार आहे, दोन दिवस एका भागात तर दोन दिवस दुसऱ्या भागात असा पाऊस पडेल, 8 ऑगस्ट नंतर मराठवाड्यातील तुरळीक भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे. जसे वातावरण असेल ते वातावरण पाहून आपण शेती पिकाचे कामे करून घ्यावे, अशी संपूर्ण माहिती त्यांनी दिली.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan