माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार..!
अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची घोषणा दिली होती. आणि आता ती योजना राबवली ही जाणार आहे. पात्र महिलांना एका महिन्यात दीड हजार रुपये वितरित केले जाणार आहे. तर या योजनेचा पाहूया पहिला हप्ता केव्हा येणार. व कोणत्या महिला या हप्त्यासाठी पात्र असणार.
सर्वप्रथम या योजनेच्या अटी मुळे बऱ्याच महिला या योजनेपासून अपात्र झाल्या असत्या. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी, त्यांनी महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहे. अपात्र ठरणाऱ्या महिलाच प्रमाण आता कमी होणार आहे. या योजनेचा आता जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारनुसार अर्जाची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या योजनेची आता संपूर्ण अमलबजावणी ही निश्चित झालेली आहे. आणि या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट रोजी महिलांना मिळू शकतो. महत्त्वाच्या रद्द करण्यात आलेल्या 7 अटी तुम्ही खालील फोटो द्वारे पाहू शकता.👇🏻