महाराष्ट्रात मान्सून या तारखेला दाखल होण्याची शक्यता.. Mansoon update
यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असणार आहे. व किती टक्के पडणार आहे. तसेच यंदा मान्सूनवर अल- निनो चा प्रभाव पडणार का.? तसेच यंदा मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार..? ही संपूर्ण माहिती आज हवामान शास्त्र विभागाने जाहीर केलेली आहे. वरील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील दिलेली संपूर्ण माहिती सविस्तर वाचावी. Mansoon update today 2024
यंदा गेल्यावर्षी परता जास्त पाऊस पडण्याची शक्यता imd हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ही महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे यंदा पावसाळा सुरू होण्या अगोदरच अल निनो चा प्रभाव संपणार आहे. तसेच यंदा जून ते सप्टेंबर या दरम्यान 106% पाऊस बसरण्याची शक्यता imd खात्याने वर्तवली आहे.
यंदा अल- निनो नसल्यामुळे महाराष्ट्र मध्ये धो- धो पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर 25 राज्यांमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यंदा imd हवामान खात्याच्या संदेशानुसार 8 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. IMD update