पुढील ४ दिवस राज्यात मान्सून कसा राहणार. माणिकराव खुळे
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. आपण त्यांनी दिलेला अंदाज सविस्तर जाणून घेऊया. सध्या राज्यात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ही संपलेला आहे. तरी या महिन्यात अजून जोरदार पाऊस आढळलेला नाही.
माणिकराव खुळे यांनी सांगितल्यानुसार मराठवाड्यात मान्सूनचा जोर 10 जुलैपर्यंत कमीच असणार आहे. असं त्यांनी सांगितले. 10 जुलैपर्यंत मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. माणिकराव खुळे यांनी अशी माहिती दिली आहे.
1 ते 6 जुलै दरम्यान चांगला पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी आता चांगल्या पावसाच्या आतुरतेत आहे. 10 जुलै पर्यंत सातारा, सांगली, पुणे, नगर, या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व विदर्भात नागपूर,भंडारा,अमरावती गोंदिया या भागात पुढील चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मागील 10 दिवसापासून मान्सूनचा जोर कमीच आहे.असे माणिकराव खुळे सांगतात.