पी एम किसान योजनेत २ हजार रुपयांची वाढ होणार का..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच चार ते पाच वर्षापासून राबवली जाणारी योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात असतो. याचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे तीन हप्ते वितरित केले जात असते. या योजनेचे आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केले आहे.
आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ करावी अशी मागणी केली जात आहे. जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष वेधले आहे, कारण या योजनेत वाढ होणार अशी अनेक चर्चा पसरली आहे, परंतु जेव्हा अर्थसंकल्पात निर्णय होईल तोपर्यंत काही समजणार नाही.
शेतकऱ्यांकडून या योजनेत जास्तीत जास्त वाढ होण्याची मागणी केली जात आहे, परंतु या योजनेत दोन ते तीन हजार रुपयांची वाढ केली जाऊ शकते. अशा बातम्या सोशल मीडिया किंवा केंद्रीय मंत्री यांच्याकडून वर्तवल्या जात आहे. या योजनेचा अर्थसंकल्पात निर्णय झाला कीच तुम्हाला संदेश दिला जाईल. ही माहिती तुम्ही खाली यूट्यूब व्हिडियो द्वारे सुद्धा पाहू शकता. 👇🏻