पावसाचा जोर वाढणार शेतकऱ्यांनो सावधान.. पंजाब डख
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा राज्यात मान्सूनचं लवकरच आगमन झालेलं होतं, परंतु मान्सूनने जून मध्ये शेवटला अनेक भागात विश्रांती घेतलेली होती. शेतकऱ्यांना पावसाची जास्त प्रतीक्षा होती. सध्या आता जुलैमध्ये पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार मागील 10 ते 15 दिवसापासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडलेला आहे.
तर राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा ही पाऊस पडलेला आहे. आणि 2-3 दिवसापासून काही भागात नुसते आभाळ भरून येत आहे परंतु मान्सून रिमझिम स्वरूपाचा चा पडत आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला नवीन अंदाज खालील प्रमाणे जाणून घेऊया,
आज दिनांक 16 जुलै ते 18 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, जेणेकरून मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, 19 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे, पंजाबराव डख असे म्हणतात की 26 जुलै पर्यंत अनेक भागात जोरदार मान्सून पडणार आहे, तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. अचानक हवामानात बदल झाला तर लगेच संदेश दिला जाईल.