नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे, पात्र लाभार्थ्यांना एका वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ दिला, या योजनेचे चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जात असतो, या योजनेचे आतापर्यंत तीन हाप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे. आणि आता शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच 2000 हजार मिळतील अशी अशा लागलेली होती, परंतु अजूनही या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही, या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच 4000 हजार रुपये 28 फेब्रुवारी 2024 रोजी खात्यात वितरित केलेले होते, आणि आता या अंतर्गत पाच महिने झाले तरी अजूनही हप्ता वितरीत झाला नाही.
नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 4000 रुपये मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची शक्यता आहे, या हप्त्यासाठी अजूनही राज्य सरकारने तारीख निश्चित केलेली नाही. याबद्दल काही अधिक माहिती मिळाल्यास तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल, तसेच खालील युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून अनेक योजनांचे पैसे जाणून घ्या.