नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता कधी मिळणार पहा लगेच.
शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते शेतकऱ्यांना वितरित केलेले आहे. आणि आता शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे. त्या हप्त्या सोबतच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती.
पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहे तेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभार्थी आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप ई केवायसी किंवा इतर पात्रता साठी लागणारी कामे लवकरच करून घ्यावी. जेणेकरून 4 था हप्ता मिळण्यास पात्र राहील. तर पाहूया नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता केव्हा मिळणार..?
राज्यातील 90.48 लाख लाभार्थ्यांना 1845.17 कोटी वितरित केले जाणार आहे. मागील या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र शेतकऱ्यांना दिला होता. परंतु आता एकच हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना चौथा हप्ता जुलै महिन्यात मिळू शकतो.