नमो शेतकरी योजनेचा ४ था हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात..!
नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले आहे. आणि आता शेतकरी चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच काही दिवसापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. Nmo shetkri 4 th instalment
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे ते पाहूया, पीएम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळाला आहे, त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे. या योजनेचा वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे,
सध्या या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार, याबाबत सध्या कोणतेही घोषणा झालेली नाही. राज्यात 27 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेल आहे. या अधिवेशनात सरकारकडून या योजनेच्या चौथ्या हप्त्याची निधी मंजूर करण्यात येईल व पुढील हप्त्यासाठी अधिकृत तारीख निश्चित करण्यात येईल.