नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केव्हा मिळणार आहे. 4th instalment
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेंबरोबरच राज्य सरकारने ही नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आणि आता शेतकऱ्यांना मात्र चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा ही देखील लागलेली आहे. या योजनेच्या हप्त्यासाठी आता लाभार्थ्याच्या याद्या सुरू करणे चालू आहे.
तसेच आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेला आहे. शेतकऱ्यांना याच हप्त्याबरोबर चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल की नाही, तसेच मिळेल ते कोणत्या तारखेला मिळनार याची माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिलेले आहे. काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकऱ्यांनी मिळाले सुद्धा नाही. या योजनेचा चौथा हप्ता लवकरच मिळणार होता परंतु निधीची तरतूद नसल्याने तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. याचा ४ हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
27- 30 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस