नमो शेतकरी योजना बंद झाली का जाणून घ्या सविस्तर माहिती..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत राज्य सरकारने नमो शेतकरी योजना नव्याने सुरू केलेली आहे, या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जात असते, या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे, आणि आता शेतकरी मात्र नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या कायम प्रतीक्षेत आहेत.
या योजनेचा चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जात असतो, परंतु मागील दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच चार हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित केले होते, याचे पैसे वितरित होऊन पाच महिने पूर्ण झालेले आहेत अजूनही चौथा हप्ता आलेला नाही, आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की मात्र याचे पैसे कधी मिळणार, व ही योजना बंद झाली काय, असे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न जाणवत आहेत.
नमो शेतकरी योजना मात्र थांबलेली नाही, या योजनेचे तुम्हाला लवकरच पैसे मिळतील. विधानसभा च्या निवडणुकामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला नाही, परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता सोबतच वितरित केला जाऊ शकतो, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तसेच या योजनेचे पैसे कधी मिळणार याची अजून ही राज्य सरकारने तारीख फिक्स केलेली नाही. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा 15 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकार हप्त्याची तारीख निश्चित करेल अशी अपेक्षा आहे. या योजनेमध्ये जर कोणती ही नवीन माहिती मिळाल्यास तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्यात येईल.