तोडकर हवामान अंदाज आजपासून ते 18 तारखेपर्यंत कसा मान्सून..!
तोडकर हवामान अभ्यासक यांनी दिनांक 13 जुलै रोजी नवीन हवामान अंदाज दिला आहे, त्या अंदाजानुसार त्यांनी आज जालना जिल्ह्यातील 70% भागात तसेच मध्य महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत, अशा भागातील 14 जुलै रोजी दुपारच्या नंतर पाऊस पडेल असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडा या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये झरीचा पाऊस असणार आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात 16 जुलै पर्यंत काही वापसा मोड तर काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज त्यांनी दिला आहे, विदर्भामध्येच जोरदार पाऊस पडेल असं त्यांनी म्हटले आहे.
वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, अमरावतीतील अनेक भागात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही, त्यामुळे अनेक शेतकरी चांगल्या मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. या वरील भागामध्ये 16 ते 19 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता तोडकर हवामान अभ्यासक यांनी दिली आहे. १६ जुलै पर्यंत तुरळीक भागात मान्सून पडेल.