जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस – हवामान तज्ञ पंजाबराव डख
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे 26 मे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 1 जून ते 4 जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगलाच धुमाकूळ घालू शकतो असा ही अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यांनी दिलेला संपूर्ण अंदाज आपण या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेणार आहोत. mansoon comming soon
राज्यात 31 मे पर्यंत आपण आपल्या शेती पिकाची संपूर्ण कामे करून घ्यावी. असा ही सल्ला त्यांनी दिला. तसेच राज्यात मान्सूनपूर्व 1 जून ते 5 जून दरम्यान अवकाळी पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. काही भागात नद्या व नाल्या ही वाहतील. मागील झालेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी पाऊस ज्या भागात पडलेला होता. त्या भागात यंदा जास्त पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
1 जून ते 5 जून पर्यंत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, या भागात या तारखे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. हा पाऊस झाल्यावर लगेच 8 – 9 जून दरम्यान लगेच मान्सून सक्रिय होणार. तसेच पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना जमिनीत एक वित ओल गेली तरच पेरणी करण्याचा आपण निर्णय घेऊ शकता. असाही सल्ला शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांनी दिला आहे.
youtube दारे व्हिडिओ पाहण्यासाठी ( click 👈)