खुशखबर नमो शेतकरी योजना लवकरच निधी वितरित होणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना राज्यात २ ते ३ वर्षापासून राबवली जात आहे, या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे. आणि आता शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता चार महिन्याला एकदा राज्य सरकार वितरित करत असतं, परंतु या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी चार महिने पूर्ण झालेले आहे अजूनही जीआर आलेला नव्हता.
नमो शेतकरी योजना बंद झाली काय अशा अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडलेले होते, परंतु असं काहीही झालेलं नाही कारण लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीमध्ये सध्या राज्य सरकार व्यस्त झालेलं आहे, तर आज राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी निधीचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे,
नमो शेतकरी योजनेच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून 2 हजार 41 कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीचा वितरण आता लवकरच होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता देखील करू नये या योजनेचे तुम्हाला लवकरच पैसे जमा होईल. या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा..धन्यवाद