खरीप पिक विमा 2023 या साठी 7150 कोटी रुपये मंजूर..!
खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांना नुकसानी पासून समोर जावे लागले, आणि आता राज्यात सध्या 7150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी 3965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या काही सूचनेनुसार 25% पीक विम्याचे अनेक जिल्ह्यात वितरण झालेले आहे.
तसेच आता उर्वरित राहिलेले 75% पिक विम्याचे वितरण हे सुरू झालेले आहे. या पिक विम्यासाठी आता 01 कोटी 10 लाख 53 हजार शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यासाठी आता राहिलेल्या पिक विम्याची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे. राहिलेला विमा जुलै च्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
तसेच तुम्ही पिक विमा साठी पात्र आहात का, तुम्हाला किती पिक विमा मिळणार ? ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली युट्युब व्हिडियो द्वारे जाणून घेऊ शकता. 👇🏻