कापूस पिकाची वाढ होत नसेल तर उपाय पहा आत्ताच…!
नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात अनेक भागात मान्सूनने हजेरी कायम लावलेली आहे, मान्सूनच्या रिमझिम प्रभावामुळे अनेक पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव आढळत आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांची कापूस पिकाला दुसरी फवारणी ही पूर्णपणे पार पडलेली आहे.
कापूस पिकाची वाढ होत नसेल तर यामागील विशेष कारण म्हणजे एका जागेवर पाणी साठवून राहणे, किंवा काही शेतकऱ्यांची जमिनी ही हलकीच असते, त्यामुळे कापूस पिकाची योग्य त्या प्रमाणात वाढ होत नाही, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक देखील नुकसान होतं. कापूस पिकाची वाढ करण्यासाठी खालील उपाय वापरू शकता.
कापूस पिकाची वाढ होण्यासाठी ( अमृत प्लस ) या किटीचा तुम्ही वापर करू शकता, याचा उपयोग एकरी तुम्ही 200 लिटरच्या पाण्यामध्ये द्रावण करून + त्यासोबत 19:19:19 या खताचा 3 किलो पाण्यामध्ये मिक्स वापर करून, तुम्ही ड्रिप्स द्वारे पाणी सोडू शकता किंवा फवाऱ्याचे नौझल काढून कपाशीच्या बुडाखाली योग्य प्रमाणात सोडू शकता.