कापूस खत व्यवस्थापन कापूस पिकाला खताचा दुसरा डोस कोणता..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कापूस लागवडीच प्रमाण यंदा झालेलं आहे, आणि शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे जास्त उत्पन्न घेण्यासाठी कपाशीला खत व्यवस्थापन, फवारणी, पूर्णपणे केलेल्या आहे. तसेच आता कपाशी 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान झाल्यावर आपल्याला कपाशीला खताचा दुसरा डोज द्यायला हवा असतो.
कापूस पिकाला खताचा दुसरा कोणता डोज द्यावा, जेणेकरून आपले पिकाचे फुटवे वाढतील, तसेच आपल्या पिकावर इतर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, आणि तसेच आपल्या पिकाची योग्य वाढ, व फुलधारणा जास्त प्रमाणात लागणे व फळ फांदी न गळणे. यासाठी तुम्ही खालील खताचा उपयोग तुम्ही करू शकता. जेणेकरून तुमच्या कपाशीला जास्तीत जास्त उत्पन्न होईल.
कपाशीला खताचा दुसरा डोज मध्ये तुम्ही 10:26:26 + मॅग्नेशियम 25 किलो + बोरॉन 2 किलो याचा तुम्ही वापर करू शकता, किंवा 12:32:16 + पोटॅश 30 किलो याचा सुद्धा वापर करू शकता. किंवा महाधन कंपनीच 8:21:21 प्रति एकरासाठी 60 kg याचा सुद्धा वापर करू शकता.