कापसाला फवारणी करताना ही काळजी घ्या नुकसान होणार नाही..?
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये कापूस पिकाच उत्पादन घेणारे शेतकरी बहुतांश आहे. आता सध्या शेतकऱ्यांची कापूस लागवड होऊन पंधरा ते वीस दिवस झालेले आहे. आणि आता शेतकरी सध्या शेतीची कामे करत आहे.आता सध्या शेतकरी आता फवारणी करण्याच्या प्रतीक्षेत आहे. फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे..?
शेतकऱ्यांनो आपल्याला कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायच असेल तर, आपल्याला कापूस लागवडीपासून कापूस निघेपर्यंत संपूर्ण नियोजन व्यवस्थित करावे लागतात. वेळेवर फवारणी, खत व्यवस्थापन, खुरपण, पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी कराव्या लागतात. फवारणी केल्यास कापूस पिकाची जोमदार वाढ होते, रोगराईचा प्रादुर्भाव टाळत नाही.
आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यायला हवी असते. जेणेकरून शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार नाही. कापूस पहिली फवारणी तुम्ही 25 दिवसाच्या आत करू शकता. पहा खाली कोणती दक्षता घ्यावी 👇🏻
1) फवारणी करताना औषधाचे प्रमाण योग्य तेच वापरावे. जास्त प्रमाणात वापरू नये.
2) शेतकऱ्यांनो फवारणी करताना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून फवारणी करावी. जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही.
3) कापूस फवारणी करताना आपल्या पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव जाणूनच योग्य औषधाची निवड करावी.
4) तसेच ज्या पंपाने आपण फवारणी करणार आहे. त्या अगोदर त्या पंपात कोणत्या औषधाची फवारणी झालेली आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.
5) तसेच कडक उन्हात जेणेकरून फवारणी टाळावी.
6) तसेच फवारणी करताना कृषी चालक संचाचा सल्ला घ्यावा.