एवढे दिवस पाऊस पडणार पावसाचा मुक्काम वाढला..!
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी काल नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, त्या अंदाजा द्वारे आपण जाणून घेऊया की राज्यात अजून किती दिवस, रिमझिम पाऊस पडेल व किती दिवस मुसळधार पाऊस पडेल, तसेच कोणत्या भागात पावसाचा जोर अधिक राहील, याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया.
पंजाबराव डख – राज्यात 21 ते 23 जुलै दरम्यान पूर्ण भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच 24 ते 30 जुलैपर्यंत राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, राज्यभर सार्वत्रिक मोठा पाऊस होईल असे पंजाबराव डख म्हणतात. तसेच 30 जुलै पर्यंत मराठवाडा, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल.
राज्यातील मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात मान्सूनचा जोर अधिक राहील, असे पंजाबराव सांगतात. तरी शेतकऱ्यांनी मान्सूनची उघडीप असल्यावर शेतीची कामे करून घ्यावी असे ही म्हणतात, त्यांनी दिलेला संपूर्ण अंदाज जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.