आज या भागात सूर्यदर्शन याच ठिकाणी पावसाची शक्यता..!
हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात मागिल 7 ते 8 दिवसापासून अनेक भागात मान्सून कायम सुरूच आहे, आणि शेतकऱ्यांना शेती पिकाची कामेही करायची आहे पण मान्सून मात्र सुरूच आहे, पण आज राज्यातील काही भागात मान्सून ने उघडीप घेतलेली आहे, तर जाणून घेऊया आज कोठे पावसाची शक्यता आहे.
आज 29 जुलै उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, तसेच गुंज प्रदेशातील काही भाग ढगांनी झाकलेले आहेत, पुढील एक-दोन तासात या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच पूर्व विदर्भाच्या काही भागात सुद्धा मान्सून हलका ते मध्यम पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात आज सकाळीच सूर्यदर्शन पाहायला मिळालेले आहेत, आज राज्यातील अनेक भागात मान्सून उघडीप घेणार आहे. आज मान्सूनची शक्यता खूपच कमी आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या माहितीनुसार समोर आलेली आहे, तसेच सातारा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे पुणे, अमरावती या भागात पावसाची शक्यता आहे.