आज या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा अतिवृष्टी होणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यात धुमाकूळ घातलेला आहे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे गावागावात पाणी शिरलेले आहेत, तसेच नद्या, नाल्या वडे फुल वाहून जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी व आपल्या जनावरांची ही देखील काळजी घ्यावी.
सर्वांचे लाडके हवामान अभ्यासक प्रसिद्ध पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी दिनांक 2 सप्टेंबर म्हणजे पोळा या दिवशी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्या अंदाजाद्वारे राज्यात अजून पुढे दोन ते तीन दिवस पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, तसेच आज राज्यातील कोणत्या भागाला ती मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, व अतिवृष्टी होणार आहे याची सुद्धा माहिती आपण खाली लेखाद्वारे पाहूया.
आज ३ सप्टेंबर उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, तसेच धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर या भागात आज अतिवृष्टी होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी सांगितलेली आहे, तसेच आज मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर असेल मात्र तीव्रता कमी राहील.
शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे किंवा पाळीव प्राणी आहेत अशा शेतकऱ्यांनी त्याची देखील काळजी घ्यावी, आणि शेतकऱ्यांनी पावसाचे वातावरण पाहून आपली स्वतःची सुद्धा देखील काळजी घ्यावी, पाऊस सुरू होताच आपण सतर्क रहावे, जेणेकरून काही नुकसान होणार नाही. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे, याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.