आज पासून मान्सून सक्रिय होणार या भागात अधिक जोर राहणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 17 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, त्या अंदाजाद्वारे राज्यात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत मान्सूनचा जोर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. पंजाब डख यांनी दिलेला मागील हवामान अंदाज पूर्णपणे खरा ठरलेला आहे, त्यांनी सांगितले होते की राज्यात 18 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे.
आज पासून राज्यात मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये मान्सूनला सुरुवात होईल. तसेच विदर्भ मध्ये 24 ऑगस्टपर्यंत मान्सूनचा जोर राहील असे त्यांनी सांगितले आहे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस विजाच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पडणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. व पावसाची उघडीप असल्यावर शेतीची कामे करून घ्यावे. पंजाबराव डख यांनी 2 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
राज्यात मान्सूनचा जोर कोणत्या भागात अधिक असेल, विदर्भातील बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोली, तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणी, आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, बीड, लातूर, नगर, या जिल्ह्यात पावसाचा अधिक जोर असेल असे पंजाबराव म्हणतात.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील यूट्यूब व्हिडिओ नक्की पहा.. 👇🏻