आज पासून पुढील २-३ दिवस या भागात पावसाचा अधिक जोर..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मान्सून कसा असेल, याबद्दल माणिकराव खुळे यांनी विशेष अपडेट दिलेली आहे, तर राज्यात 5 ऑगस्ट पर्यंत मान्सून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडेल तर काही भागात जोरदार मान्सून पडेल, असे हवामान अभ्यासत माणिकराव खुळे सांगतात. ( august 2-3 day rain update of manikrao khule )
राज्यात पुढील दोन-तीन दिवस गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात अति जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिलेला आहे. तसेच 5 ऑगस्ट नंतर कोकण सोडता संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल असे खुळे सांगतात.
5 ऑगस्टपर्यंत हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे, तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, वाशिम, अकोला, या भागात कमी पावसाचा अंदाज राहील. अशी माहिती माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.