आज आणि उद्या या भागातील शेतकऱ्यांना सतर्कचा इशारा…!
प्रसिद्ध हवामान अभ्यासक सर्वांचे लाडके पंजाबराव डख हे शेतकऱ्यांसाठी दोन ते तीन दिवसाला नवनवीन हवामान अंदाज देत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील जास्तीत जास्त नुकसान होत नाही. आता राज्यात 26 आणि 27 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा वर्तवलेला आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी देखील सुद्धा होणार आहे.
26 ऑगस्ट, आणि 27 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा, विदर्भ, पश्चिम उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकण किनारपट्टी, तसेच नाशिक या भागात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, तरी या भागातील शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहावे, असे पंजाबराव डख म्हणतात.
राज्यात 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण असेल व काही भागात तुरळीक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर जास्तीत जास्त भागात हवामान कोरडे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघडीप बघून शेतातील कामे करून घ्यावी.
राज्यात पुन्हा 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात झाडाखाली कुठेही थांबू नये स्वतःची काळजी घ्यावी, आणि आपल्या जनावरांची सुद्धा देखील काळजी घ्यावी.