अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला अजून किती दिवस राहणार mansoon today update
नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या ७-८ दिवसापासून पावसाने मात्र अनेक भागात धुमाकूळ घातलेला आहे, तसेच विदर्भातील काही भागात गारपीट सुद्धा पाहायला मिळाली आहे, आणि आपल्या मराठवाड्यातील तुरळीक ठिकाणी काही काही भागात , मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडलेला आहे. गारपीट, वादळी वारे हे देखील अनेक भागात दिसून आले.
तर पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. कि अजून राज्यात किती दिवस पावसाचा मुक्काम आहे. हे या लेखाच्या माध्यमातून पाहूया..
तरी नवीन हवामान अंदाजानुसार दिलेल्या माहितीनुसार राज्यात 21 एप्रिल 2024 पर्यंत वातावरण हे देखील खराबच राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी 21 एप्रिल पर्यंत सतर्क रहावे. आज तर 16 एप्रिल सकाळीच अनेक भागात वातावरण हे देखील खराब बघायला मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी मात्र सावधान राहावे. असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सल्ला दिला आहे.
तसेच शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी, तसेच जनावरांची सुद्धा मात्र काळजी घ्यावी यांना देखील व्यवस्थित ठिकाणी बांधावे, त्याचबरोबर आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी झाडाखाली उभा राहू नये. असा संदेश पंजाब डख यांनी दिला.
तरी विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, गारपिटीचा इशारा देखील वर्तवण्यात आलेला आहे, आणि मराठवाड्यातील तुरळीक ठिकाणी सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी 21 एप्रिल पर्यंत सतर्क राहावे. Panjabrao dakh