अजून एवढे दिवस राज्यात अवकाळी वारे गारपिट…
नमस्कार शेतकरी मित्रांनो काल राज्यात अनेक ठिकाणी तुफान गारपीट झालेली दिसून येत आहे, त्यासोबत काही ठिकाणी अवकाळी वारे देखील सुटले होते, आणि काही काही भागात मात्र पावसाने सुद्धा हजेरी लावलेली होती. अजून पावसाचे आता किती दिवस बाकी आहे. हे आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पंजाबराव डख यांनी हा संपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे.
12 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी गारपीट होणार, अवकाळी वारे देखील सुटणार. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली काळजी घ्यावी. तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही महत्वपूर्ण बातमी परभणी जिल्ह्यात 18 एप्रिल पर्यंत वातावरण देखील खराबच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशी माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवलेली आहे.
12 ते 18 एप्रिल परभणी जिल्ह्यात काही काही भागात अवकाळी वारे देखील सुटणार आहे, तसेच गारपीट सुद्धा काही काही भागात होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 18 एप्रिल पर्यंत सतर्क रहावे. जर हवामाणात अचानक बदल झाला तर लवकरच तुम्हाला कळविण्यात येईल. असे पंजाबराव डख म्हणतात.