पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सून ने अनेक भागात मागील तीन ते चार दिवसापासून उघडीप घेतलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या देखील आता पेरण्या ही झालेल्या आहेत. आणि आता शेतकरी चांगल्या पावसाच्या देखील प्रतीक्षेत आहेत. विदर्भातही आता लवकरच काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
ज्या भागात शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झालेल्या नाही. त्या शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर जमिनीनीत एक इत ओल गेल्यावरच पेरणीच्या निर्णय घ्यावा. असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात. राज्यात अजून दोन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम तसेच काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 27 ते 30 जून दरम्यान राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, या सर्व भागात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी वर्तवली आहे. 30 जून पर्यंत काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आज मान्सूनसाठी सकाळीच पोषक वातावरण देखील काही भागात झालेले आहे. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेला व्हिडिओ तुम्ही खालील यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊ शकता👇🏻