कापसाचे कोणते बियाणे आहे भारी कबड्डी की राशी की 7067 जाणून घ्या..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता थोड्या काहीच दिवसात मान्सूनचं आगमन होणार आहे. आणि आता शेतकऱ्यांची मात्र शेती कामही पूर्णपणे पार पडलेले आहे. तरी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी म्हणजे कापसाचे योग्य बियाणे कोणते. व आपल्या जमिनीनुसार शेतकऱ्यांना शोधावे लागतात, तुम्ही जर या बियाण्याचे वापर करत असाल तर याची संपूर्ण माहिती तुम्ही या लेखाद्वारे जाणून
घ्या.
1) कबड्डी – हे वाण मागील एक ते दोन वर्षापासून अनेक चर्चेत आहे. हे वाण बागायती क्षेत्रासाठी चांगलं उत्पादन देऊ शकतं. अनेक शेतकऱ्यांनी या बियाण्याचं ऍव्हरेज एकरी 8 ते 10 क्विंटल घेतलेल आहे.
2) राशी 659 हे बियाणं देखील 2017 पासून अनेक शेतकरी याची लागवड करत आलेले आहे. शेतकऱ्यांनी या वाणाचा अनुभव ही देखील घेतलेला आहे. या बियाण्याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे याच बोंड दुसऱ्या बियाण्या परता टपोर आहे. चांगल्या जमिनीमध्ये तुम्ही या वाणाचं 12 ते 15 क्विंटल उत्पादन घेऊ शकता.
3) US- 7067 – तुम्हाला जर कापसाची एकच वेचणी करायची असेल तर हे वाण देखील लवकरच येतंय. या वाणाची तुम्ही चांगल्या प्रकारे फरतड धरू शकत नाही. हे वाण आपल्या शेतातून लवकरच मुक्त होतय.
शेतकरी बांधवांनो आपल्याला जर आपल्या शेतीमध्ये कोणत वाण योग्य येतंय व कोणत बियाणं आपल्याला जबरदस्त उत्पादन देत, किंवा तुम्ही त्या वाणाचा अनुभव घेतलेला आहे. त्या वाणाची ही तुम्ही देखील लागवड करू शकता. फक्त आपण आपल्या पिकाची योग्य प्रमाणात काळजी घेतली पाहिजे. खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन, फवारणी, हे सर्व योग्य वेळी केले पाहिजे.
युट्युब द्वारे पाहण्यासाठी क्लिक करा